परभणी- शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
परभणीत पावसाची जोरदार हजेरी हेही वाचा -परभणीत गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; अडीच हजाराचा फौजफाटा तैनात
परभणी जिल्ह्यात सरासरी 774.62 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षात सुमारे 70-75 टक्के पाऊस पडत असल्याने पावसाचा मोठा खंड पडत आहे. त्यामुळे सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 महिन्यात परभणी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या केवळ 68.87 टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंत प्रत्यक्षात 607.24 मिलिमीटर पाऊस पडायला हवा होता. परंतु, 417 मिलिमीटरच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अपेक्षित पावसाच्या 30 टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 62 टक्के आहे.
हेही वाचा - वडिलांना भाजपच्या दारात मुजरा करायला लावणारे वंशाचे दिवे काय कामाचे, सुप्रिया सुळेंची टीका
त्यामुळे येणाऱ्या केवळ 18 दिवसांमध्ये 40 टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे. तर जिल्ह्यातील मासोळी, येलदरी, निम्न, दुधना, करपरा, दिग्रस, मुळी या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 10 ते 20 टक्के साठा पाणीसाठा शिल्लक आहे. तर 22 लहान-मोठ्या प्रकल्प अजूनही मृत साठ्यातच आहेत. त्यामुळे हे प्रकल्प भरण्यासाठी येणाऱ्या 40 दिवसात दमदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे.