परभणी - कालच जागतिक महिला दिन होऊन गेला. याच दिवशी जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाजवळ स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. एका जनावराच्या गोठ्यात हे अर्भक आढळले. त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्या आईचा तपास पोलीस करत आहेत.
बेवारस स्थितीत आढळले स्त्री जातीचे अर्भक, महिला दिनी परभणीतील प्रकार - परभणी
अर्भकाला कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. डॉ. जाधव यांनी अर्भकाची तपासणी करून परभणीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कौसडी गावाजवळ असलेल्या गुळखंड फाटा येथे सिताबाई हरिभाऊ राऊत यांचा जनावराचा गोठा आहे. या गोठ्यात सिताबाईंना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी गोठा तपासला असता त्यांना हे अर्भक दिसले. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
सिताबाईंचे शेजारी सय्यद आय्युब यांनी पोलीस पाटलांना याची सूचना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना याची माहिती दिली. त्यानंतर अर्भकाला कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. डॉ. जाधव यांनी अर्भकाची तपासणी करून परभणीच्या जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मातेचा शोध सुरू आहे.