महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात ८ दिवसात सापडली दुसरी "नकोशी"; उपचाराभावी मृत्यू - found

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पूर्णा तालुक्यातील ताडकळस भागात एक नकोशी सापडली होती. मात्र, या नकोशीचा आज (बुधवारी) उपचाराभावी मृत्यू झाला आहे.

बेवारस सापडलेले स्त्री जातीचे अर्भक

By

Published : Mar 13, 2019, 5:54 PM IST

परभणी -जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पूर्णा तालुक्यातील ताडकळस भागात एक नकोशी सापडली होती. मात्र, या नकोशीचा आज (बुधवारी) उपचाराभावी मृत्यू झाला आहे.

ताडकळस भागातील झाडगाव परिसरात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीने फेकून दिलेले एक स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. गंभीरबाब म्हणजे या बाळाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. रखरखत्या उन्हात उघड्या अंगाने तिला रस्त्यावर टाकले होते. या बाळाचा आवाज ऐकून ग्रामस्थ गोळा झाले. परंतु, त्यांच्यापैकी कुणीही त्या चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी पुढे आले नाही. तिला कोणीच दवाखान्यात नेले नाही.
पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिला प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना कमी वजन असल्यामुळे तिचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे गेल्या पाच दिवसातील ही दुसरी घटना आहे.

या अगोदर महिला दिनी (८ मार्च) गुळखंड फाटा (ता.जिंतूर) या ठिकाणी देखील स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. मात्र, ते ज्या महिलेला सापडले तिच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच उपचार मिळाल्याने ते जिवंत आहे.
दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणातील निर्दयी माता-पित्यांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details