परभणी -येथील जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये शेवाळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच असा प्रकार घडल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोग्य प्रशासनाच्या कामगिरीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
परभणीच्या जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये शेवाळ आढळल्याने खळबळ.... हेही वाचा... धक्कादायक... पुण्यातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सलाईनमध्ये आढळले शेवाळ
जिल्हा रुग्णालयातील सलाईनच्या बाटलीत शेवाळ असल्याचा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील अधिपरीचारकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर या सलाईनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तरीही यातून आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातही नुकताच असा प्रकार उघडकीस आला होता. त्या ठिकाणीही सलाईनमध्ये शेवाळ आढळल्याचे समोर आले होते. तसाच प्रकार परभणीतही झाल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा... भारतात 'कोरोना'चा पहिला रुग्ण; केरळच्या विद्यार्थ्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न..
काही दिवसांपूर्वी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील पुरुष कक्षात, सलाईनच्या बाटलीत शेवाळ आढळून आले. ही बाब त्या ठिकाणच्या अधिपरिचारकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर या सलाईनच्या सर्व बॅचला जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भातील व्हिडिओ अधिपरिचारक जितेश टोम्पे याने घेतला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात आलेल्या औषध पुरवठ्यामध्ये अशाप्रकारचा हलगर्जीपणा होत असल्याने जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण बरे होण्याऐवजी आणखीन आजाराला बळी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा