महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत चार एकर ऊस जळून खाक, आग विझवताना एकजण जखमी - farm burned in pathri

पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ४ एकर उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्व ऊस जळून खाक झाला.

जळालेला उस

By

Published : Apr 30, 2019, 1:35 PM IST

परभणी- पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ४ एकर उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली. या आगीत सर्वजळून खाक झाला. आग विझवण्यास गेल्यामुळे एकाचा हात भाजला आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे शहरासह तालुक्यात आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जळालेला उस

जवळा झुटा येथे निरंजन राठोड यांची ४ एकर जमीन असून यात उसाची लागवड केलेली आहे. हाऑक्टोबरमध्ये तोडणी झाल्यानंतर राहिलेल्या पाचटाची यंत्राद्वारे बारीक कुट्टी केली होती. या पाचटाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात मुलगा राजेश राठोड यांचा डावा हात भाजला तर निरंजन यांच्या पत्नीच्या साडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला मात्र, संपूर्णजळाल्याचे राठोड यांनी सांगितले.

आग विजवण्यासाठी जवळ पाण्याची व्यवस्था नसल्यानेजळून खाक झाला. ही आग नेमकी कशाने लागली, हे मात्र समजू शकले नाही. जखमी राजेश राठोड यांना तातडीने आष्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निरंजन राठोड यांनी पाथरी तहसिलदारांना केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details