परभणी- परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येक पक्षाला संधी मिळाली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत मोठा विजय मिळवला. तर रासपच्या रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून गंगाखेडची लढाई जिंकली आहे. तसेच पाथरीत मागच्यावेळी निसटता पराभव स्वीकारणाऱ्या काँग्रेसच्या सुरेश वरपूडकरांनी यंदा मात्र बाजी मारली. जिंतूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार विजय भांबळे यांना धूळ चारत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी विधानसभा गाठली आहे.
- परभणीत आमदार राहुल पाटलांना 80 हजारांचे मताधिक्य
दरम्यान, परभणी मतदार संघात सेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी 'एमआयएम' चे आली खान यांच्यावर तब्बल 80 हजार 803 मतांची आघाडी घेऊन मोठा विजय मिळवला. खान यांना 22 हजार 666 मते मिळाली असून, तिसऱ्या क्रमांकावरील वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस यांना 22 हजार 620 तर काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी 18 हजार 260 मते मिळवली. तर प्रमुख उमेदवारांमध्ये शेवटच्या स्थानी राहिलेले काँग्रेसचे रविराज देशमुख यांना मात्र केवळ 15 हजार 441 मते मिळाली आहेत. एकूणच परभणीत जनतेने गेल्या तीस वर्षांपासून असलेला आपला शिवसेनेवरील विश्वास कायम ठेवत डॉ.राहुल पाटील यांना निवडून दिले आहे.
- जिंतूरात मेघना बोर्डीकरांचा भांबळेंवर 'विजय'
जिंतूर विधानसभा मतदार संघात प्रचंड अटीतटीची लढत होऊन शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजय भांबळे यांच्यावर आघाडी मिळवून विजय संपादन केला. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 146 मते मिळाली असून विजय भांबळे यांना 1 लाख 12 हजार 579 मते मिळाली आहेत. बोर्डीकर या 3 हजार 567 मतांनी विजयी झाल्या. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 107 तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राम खराबे यांना केवळ 4 हजार 717 मते मिळाली आहेत.
- ...अखेर पाथरीत सुरेश वरपुडकरांनी बाजी मारली