महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील एसबीआयच्या विमा कार्यालयात शेतकऱ्यांचे भजन आंदोलन

मानवत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या २०१७ मधील पीक कर्जातून प्रति लाखास २० हजार रुपयांची पॉलिसी काढून घेतली. बँकेस दत्तक असलेल्या ७ गावातील शेतकऱ्यांचे ३ कोटी रुपयांचा हप्ता वसूल केला.

Breaking News

By

Published : Mar 8, 2019, 9:27 PM IST

परभणी - मानवत तालुक्यातील 7 गावांमधील शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या पीक विम्यातून 3 कोटींहून अधिक रुपयांचे विमा हप्ते कपात केल्याचा आरोप स्टेट बँक ऑफ इंडियावर होत आहे. या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी ३ दिवसांपासून मानवतच्या शाखेसमोर 'मुक्काम ठोको' आंदोलन केले, परंतु याप्रकरणी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी दाद देऊ शकते, असे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) परभणीतील एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात धरणे देऊन भजन आंदोलन सुरू केले.

परभणी

मानवत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या २०१७ मधील पीक कर्जातून प्रति लाखास २० हजार रुपयांची पॉलिसी काढून घेतली. बँकेस दत्तक असलेल्या ७ गावातील शेतकऱ्यांचे ३ कोटी रुपयांचा हप्ता वसूल केला. त्यावेळी कर्ज हवे, म्हणून यास कोणीही विरोध केला नाही. मात्र, त्यानंतर शासनाने पीक कर्ज देणेच बंद केले. तसेच दुष्काळामुळे शेतात काही पिकले नाही. म्हणून हा हप्ता यापुढे शेतकऱ्यांना भरणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी या पॉलिसी रद्द कराव्यात, या मागणीसाठी ३ दिवसांपासून मानवतच्या बँकेत मुक्काम ठोको आंदोलन केले. परंतु, याप्रकरणी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी निर्णय घेऊ शकते, असे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी परभणीतील इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या मांडून भजन कीर्तन आंदोलन सुरू केले आहे.
या प्रकरणी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. हे प्रकरण आपण वरिष्ठांकडे पाठवले आहे, यावर तेच निर्णय घेऊ शकतील, असे सांगितले. तर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी आरोप केला की, बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details