परभणी - बैलपोळा सणानिमित्त घरात बैलांना आंघोळ घालत असताना एका बैलाने दिलेल्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे घडली. त्यामुळे ऐन सणाच्या दिवशीच गावावर शोककळा पसरली आहे.
पोळ्याच्या दिवशी बिथरलेल्या बैलाने घेतला शेतकऱ्याचा जीव, परभणी जिल्ह्यातील घटना - ब्राह्मणगाव
ऐन पोळ्याच्या दिवशीच बैलाने धक्का दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे घडली. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
आसाराम भावसिंग राठोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते 48 वर्षांचे होते. शुक्रवारी पोळ्या निमित्ताने ते सकाळी 11 वाजता बैलांना आंघोळ घालत होते. मात्र बिथरलेल्या एका बैलाने त्यांना अचानक जोरदार धडक मारली. या जबर धडकेमुळे राठोड जमिनीवर कोसळले आणि बेशुध्द पडले. घरातील लोकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शुक्रवारी सर्वत्र पोळा सण साजरा होत असताना अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे ब्राम्हणगावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, शेतकरी राठोड यांच्या पश्चात आई, वडील व दोन मुले असा परिवार आहे.