परभणी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) परभणीमध्ये एका कृषी महोत्सवात सौर उर्जेवर चालणाऱ्या स्कूटरवरून फेरफटका मारण्याचा आनंद घेतला. याच स्कूटरवरून ते सभामंडपातही पोहचले. परभणीच्या वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयातील कृषी संजीवनी महोत्सवाचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी फडणवीस यांनी या महोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली
देवेंद्र फडणवीसांचा ई-स्कूटरवरून फेरफटका मात्र पदाधिकाऱ्यांची दमछाक हेही वाचा - 'मोदी हे पंतप्रधान पदाला शोभेल असे वागत नाहीत'
प्रदर्शनाची पाहणी करत असताना देवेंद्र फडणवीस यांना त्याठिकाणी असलेल्या ई-स्कूटरवर बसण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी या स्कूटरवर बसून प्रदर्शनाच्या परिसरात फेरफटका मारला. तसेच याच स्कूटरवर बसूनच ते सभामंडपात देखील पोहोचले. दरम्यान, ते स्कूटरवरून धावत असताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मात्र त्यांच्या मागे धावताना चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. फडणविसांनी स्कूटरचा आनंद घेतला असता तरी इतरांची मात्र धावपळ झाली.
हेही वाचा - 'पंतप्रधानांनी उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'