महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरत्यावर्षाला साधेपणाने निरोप द्या; परभणी जिल्हा प्रशासनाचे जल्लोषावर निर्बंध - नव वर्ष स्वागतावेळी जल्लोषाला बंदी

जिल्ह्यात नव वर्षाच्या स्वागताासाठी नागरिकामंध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने नव वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. नागरिकांनी घरातून सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

welcome 2021 in an extremely simple
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

By

Published : Dec 31, 2020, 12:08 PM IST

Updated : Dec 31, 2020, 12:33 PM IST

परभणी - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रतिवर्षी ठीकठिकाणी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळतो. यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गर्दी करण्यावर निर्बंध लावले आहेत. सरत्या वर्षाला साधेपणाने निरोप द्यावे द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळांमध्ये होणारी गर्दी देखील टाळावी, असेही आदेश त्यांनी जारी केले आहेत.

'सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये -

कोरोनाच्या अनुषंगाने आज (शुक्रवारी) जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे उद्या (गुरुवारी) दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व शुक्रवारी (एक जानेवारी 2021) नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे. गुरुवारी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग राहील, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहनही मुंगळीकरांकडून करण्यात आले आहे.

अबाल वृद्धांनी बाहेर जाणे टाळावे-

जिल्ह्यातील नागरी भागात अऩेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे. 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, मिरवणुका काढू नयेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (एक जानेवारी) नागरिक धार्मीक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, शक्यतो धार्मीक स्थळी गर्दी करू नये, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.


'प्रशासकीय यंत्रणेलाही सूचना -

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी तर काळजी घ्यावीच मात्र, सोबतच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी देखील सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच सामान्य नागरिकांकडून देखील या सूचनांचे पालन करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Last Updated : Dec 31, 2020, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details