महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या संचारबंदीत शिथीलता; सोमवारपासून 9 ते 5 या वेळेत बाजारपेठ राहणार सुरू

गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या वाढणार्‍या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 8 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, यात आता उद्यापासून (सोमवार) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील बाजारपेठ सोमवारपासून सुरू होणार आहे.

curfew open for 9 am to 5 pm in parbhani
परभणीच्या संचारबंदीत शिथीलता

By

Published : Jul 19, 2020, 9:53 PM IST

परभणी - गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या वाढणार्‍या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 8 दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, यात आता उद्यापासून (सोमवार) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील बाजारपेठ सोमवारपासून सुरू होणार आहे. यामध्ये ज्या अस्थापनाना परवानगी देण्यात आली आहे, त्याच सोमवारी उघडतील, असेेही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

परभणी जिल्ह्यात 12 जुलैपासून लागू केलेली संचारबंदी सोमवारपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता शिथील करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज जारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी दिली आहे.


ज्या आस्थापनांना व अत्यावश्यक बाबी सुरु ठेवण्यास परवानगी आहे. त्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील. त्यानंतर सायंकाळी 5 ते दुसर्‍या दिवशीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आदेश अंमलात राहील. तसेच दुध विक्रेत्यांनी गल्ली, वसाहतींमध्ये घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 याच कालावधीत दुधाचे वितरण करावे. त्यांना एका ठिकाणी थांबून दुध विक्री करता येणार नाही. शिवाय बँकाना ग्राहकांसाठी काम करण्याचा कालावधी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. तसेच ज्या आस्थापना व दुकानांना सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नाही, ते बंदच राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.


दरम्यान, सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या तपासणीनंतर मोठ्या प्रमाणात व्यक्ती कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तसेच सूट दिलेल्या कालावधीत नागरिकांची मोठ्या प्रमाणात बाजारपेठ, दुकानांवर व सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील आठवडाभर संचारबंदी लागू करण्यात आली होती. परभणी मनपा हद्द आणि लगतचा 5 किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायतींच्या हद्दीत व ग्रामीण भागात देखील ही संचारबंदी सुरु होती. दरम्यान, ही शिथीलता प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details