परभणी- जिल्ह्यातील सेलू शहरातील रेल्वेस्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या महिंद्रा केयुव्ही १०० के -२ या कारने (एमएच ११ सीजी ७४४३) अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात पार्किंगमधील कार जळून खाक - parbhani district
३ महिन्यांपूर्वीच १० लाख रुपये किंमतीची ही डिझेल कार खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी सेलू पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
या आगीत कारचा आतील संपूर्ण भाग जळून खाक झाला असून ही कार अहमदनगर येथील रहिवासी तथा जीटीएल कंपनीच्या मोबाईल टॉवरचे गुत्तेदार परशुराम बावकर यांच्या मालकीची होती. जिल्ह्यातील १४ टॉवरची दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट त्यांच्याकडे आहे. संबंधित कारमालक बावकर हे सायंकाळी ५ वाजता परभणीहून वालूर येथील टॉवरची दुरुस्ती करून रात्री सेलू येथे टॉवर असलेल्या गोविंदा लॉजमध्ये गेले होते. मात्र, ९ वाजेच्या सुमारास गाडीतून धूर निघण्यास सुरुवात झाली व अचानक गाडीने जोरदार पेट घेतला.
सेलू नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणेपर्यंत कारमधील संपूर्ण भाग जळून खाक झाला होता. बावकर यांनी १३ महिन्यांपूर्वीच १० लाख रुपये किंमतीची ही डिझेल कार खरेदी केली होती. याप्रकरणी सेलू पोलिसात नोंद करण्यात आली आहे.