परभणी -येथील रेल्वेस्थानक पुढे असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी रीघ लागली होती. सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर दिवसभर पुतळ्याला हार घालण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन करून अभिवादन केले. तर, रात्री उशिरा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील पुतळा परिसराला सजवण्यात आले होते. याठिकाणी पुस्तक आणि साहित्य विक्रीचे दुकाने थाटली असून भीमसैनिकांची मोठी रेलचेल दिसून आली. १४ एप्रिलला सकाळपासूनच भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.