महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर परभणीत सट्टा, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणीतील कालिका मंदिराच्या बाजूला ऑस्ट्रेलियात लाइव्ह सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर काही जण सट्टा लावत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस, फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांसोबत त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे चार जण सोनी टीव्हीवर लाइव्ह चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया देशातील बिग बॅश क्रिकेट लीग सामन्यावर लोकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले.

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर परभणीत सट्टा
bets-on-the-big-bash-cricket-tournament-in-australia-in-parbhani

By

Published : Dec 16, 2020, 1:35 PM IST

परभणी -ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. गणेश पांचाळ, गोविंद आबूज, सचिन बनसोडे, किशोर तोष्णीवाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून ३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरुन पोलिसांचा छापा -

परभणीतील कालिका मंदिराच्याबाजूला ऑस्ट्रेलियात लाइव्ह सुरु असलेल्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर काही जण सट्टा लावत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस, फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यासोबत त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे चार जण सोनी टीव्हीवर लाईव्ह चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया देशातील बिग बॅश क्रिकेट लीग सामन्यावर लोकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या चौघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाने दहा मोबाईल, तीन दुचाकी, असा एकूण ३ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details