परभणी - खासगी संस्थाचालकांनी उच्च माध्यमिक शालान्त मंडळाकडून अभ्यासक्रमातील काही विषयांची मान्यता न घेताच विद्यार्थ्यांना परिक्षेस बसविले होते. त्यामुळे औरंगाबाद मंडळाने बारावीतील हजारो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखून धरल्या होत्या. परंतु, प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ हजार १०० रुपयांचा दंड आकारून मंडळाने सध्या या गुणपत्रिका संस्थांना दिल्या आहेत.
परभणीत 12 वीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचा पेच; विद्यार्थ्यामागे ११०० रुपयांचा दंड
जिल्ह्यातील जवळपास ७६ महाविद्यालयांनी परीक्षा घेण्यासाठी मंडळाची मान्यता घेतली नसल्याचे दिसून आले. बारावीतील विज्ञान शाखेच्या क्रॉप सायन्स या विषयाच्या अभ्यासक्रमास मंडळाची मान्यता घेण्याऐवजी संबंधित संस्थाचालकांनी परस्परच हजारो विद्यार्थी परीक्षेस बसविले होते.
जिल्ह्यातील जवळपास ७६ महाविद्यालयांनी परीक्षा घेण्यासाठी मंडळाची मान्यता घेतली नसल्याचे दिसून आले. बारावीतील विज्ञान शाखेच्या क्रॉप सायन्स या विषयाच्या अभ्यासक्रमास मंडळाची मान्यता घेण्याऐवजी संबंधित संस्थाचालकांनी परस्परच हजारो विद्यार्थी परीक्षेस बसविले होते. हा प्रकार परीक्षेच्या तोंडावरच निदर्शनास आल्यानंतर मंडळाने मानवी दृष्टीकोनातून या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले. परंतु, बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर मंडळाने त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका रोखून धरल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थाचालकांनी परभणीत आलेल्या मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अन या पेचातून मार्ग काढण्याकरिता धडपड सुरू केली होती. दरम्यान, या पेचातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार मंडळाच्या अधिकाऱयांनी संबंधित संस्थाचालकांना पाचारण करीत प्रती विद्यार्थ्यांच्या मागे १ हजार १०० रुपयांचा दंड आकारीत गुणपत्रिका वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दंडात्मक कार्यवाही करीत उशिरा गुणपत्रिका वाटप करण्यात आल्या.
दरम्यान, संस्थाचालकांनी हा दंड अन्यायकारक असून सध्या आम्ही अर्धी रक्कम जमा केली आहे. उर्वरित रकमेसाठी शासनाकडे न्याय मागू, असे यावेळी जमलेल्या संस्थाचालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.