महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याची हत्या; जिंतूर तालुक्यातील घटना - yeknath pavde

किरकोळ घरगुती कारणावरून एका पुतण्याने चुलत्याची हत्या केली आहे. आरोपी एकनाथ पावडे याने जवळचा चाकू काढून तो मधुकर पावडे यांच्या पोटामध्ये खुपसत जबर मारहाण केली आहे.

मधुकर पावडे

By

Published : Jun 21, 2019, 10:41 PM IST

परभणी - किरकोळ घरगुती कारणावरून एका पुतण्याने चुलत्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे आज शुक्रवारी ही घडली आहे.

एकनाथ अंबादास पावडे (पुतण्या) व मधुकर बापुराव पावडे (चुलता) यांच्यामध्ये अनेक दिवसापासून कौटुंबिक मतभेद होते. या मतभेदाचे रुपांतर खुनामध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.


शुक्रवारी सकाळी मधुकर पावडे हे मोटरसायकलवरून येलदरीकडे जात होते. यावेळी आरोपी एकनाथ आंबादास पावडे याने ऑटोमध्ये बसून त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग केला. मधुकर पावडे यांच्या मोटर सायकलला ऑटो रिक्षाची धडक देऊन मधुकर यांना खाली पाडले.

जिंतूर


त्यानंतर आरोपी एकनाथ पावडे याने जवळचा चाकू काढून तो मधुकर पावडे यांच्या पोटामध्ये खुपसत जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत मधुकर पावडे यांना जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दुपारनंतर मधुकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले.


जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात काही सहआरोपी देखील असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. त्यावरून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details