महाराष्ट्र

maharashtra

परभणीत गुरूवारी पाच जणांना कोरोनाची लागण; शनिवारपर्यंत संचारबंदी लागू

By

Published : Jun 26, 2020, 2:27 AM IST

मागच्या आठवड्यात एकही रुग्ण न आढळलेल्या परभणी जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची मालिका सुरू झाली आहे. गेल्या 24 तासात 11 निगेटिव्ह तर 5 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

parbhani corona update
परभणी कोरोना अपडेट

परभणी -जिल्ह्यात गुरुवारी पाच नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यात शहरातील 4 आणि तालुक्यातील एकाचा समावेश आहे. याशिवाय 14 संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 103 वर पोहोचली आहे.

दरम्यान, त्यातील 90 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 10 जणांवर सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागच्या आठवड्यात एकही रुग्ण न आढळलेल्या परभणी जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची मालिका सुरू झाली आहे. गेल्या 24 तासात 11 निगेटिव्ह तर 5 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

3 दिवस संचारबंदी -

परभणी शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमुळे पुन्हा एकदा महापालिका क्षेत्रासह पाच किलोमीटर परिसरात गुरुवार ते शनिवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुरुवारी संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. शहरात अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कुठलेही वाहन किंवा व्यक्ती फिरतांना दिसून आले नाहीत. सकाळी दहा वाजेपर्यंत दुधवाले आणि वृत्तपत्र विक्रेते दिसून आले. मात्र, त्यानंतर सायंकाळपर्यंत रस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

गुरूवारी आढळलेले बाधित -

  • शहरातील एकबाल नगरात 61 वर्षीय पुरुष
  • अपना कॉर्नर येथील 38 वर्षीय महिला
  • गव्हाणे चौक येथील 21 वर्षीय महिला
  • काद्राबाद प्लॉटमधील 27 वर्षीय महिला
  • तालुक्यातील पाथरा गावातील 20 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.

या पाचही रुग्णांना कोरोना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. त्यापैकी बहुतांश लोकांचे स्वॅब गुरुवारी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गुरुवारी 14 आणि बुधवारी 2 संशयित रुग्ण दाखल झालेल्या एकूण 16 रुग्णांचा अहवाल देखील तपासणीसाठी नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू

दरम्यान, आतापर्यंत परभणी जिल्ह्यात 2 हजार 627 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 598 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 103 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिवाय 80 रुग्णांचे अहवाल अनिर्णयक आहेत, तर 47 रुग्णांचे अहवाल तपासणीची आवश्यकता नाही, असा निर्वाळा प्रयोगशाळेने दिलेला आहे. एकूणच जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 513 जणांनी विलगिकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामध्ये 67 जण परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील 6 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details