परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. कालपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजन क्षीरसागर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांनी अर्ज दाखल केले.
परभणी लोकसभेसाठी आतापर्यंत १३ उमेदवारी अर्ज दाखल, वंचित बहुजनसह भाकपही रिंगणात - loksabha
सोमवारी अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत. भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला.
सोमवारी अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत. भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यासह बहुजन सोशलिस्ट पक्षाचे यशवंत कसबे, बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेक इब्राहीम, अपक्ष संगिता निर्मल, डॉ. अप्पासाहेब कदम, सखाराम बोबडे, किशोर मुन्नेमाणिक यांनी अर्ज दाखल केले.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेचे संजय जाधव हे युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरतील. तर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर शरद पवार, उदयनराजे भोसले, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरतील.