पालघर- समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणांनी कार धुण्यासाठी खोल पाण्यात नेल्याने खळबळ उडाली. ही कार मोठ्या लाटा आल्याने समुद्रातच अडकून पडली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी मोठ्या मेहनतीने ही कार बाहेर काढली. ही घटना गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेल्या उंबरगाव येथील किनाऱ्यावर घडली.
आली लहर केला कहर; फिरण्यासाठी समुद्रकिनारी आलेल्या तरुणांनी धुण्यासाठी कार घातली समुद्रात अन् . . . . - समुद्रकिनारा
मुंबईतील चार तरुण फिरण्यासाठी गुजरात सीमेवरील उंबरगाव येथे आले होते. त्यांनी किनाऱ्यावर फिरताना कार समुद्रात उतरवली. मात्र मोठ्या लाटा आल्याने कार समुद्रातच अडकून पडली.
उंबरगाव येथे मुंबईचे तरुण फिरण्यासाठी आले होते. समुद्रकिनारी आलेल्या या तरुणांनी आपली कार धुण्यासाठी समुद्रात उतरवली. मात्र अचानक समुद्रात आलेल्या भरतीमुळे ही कार समुद्रातच अडकली. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर स्थानिकांच्या मदतीने ही कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली.
अतिउत्साही पर्यटक आपल्या कार, दुचाकी समुद्र किनाऱ्यावर आणतात. त्यानंतर उत्साहाच्या भरात स्टंट करतात. मात्र धोकादायक पद्धतीने या गोष्टी केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले.