महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फटका : रोजंदारांवर गावी जाण्यासाठी आली पायपीटीची वेळ; महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच अडकले

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात राहणारे अनेकजण घराकडे जाण्यासाठी पायपीट करत आहेत.

lock down effect  maharashtra gujrat border  corona update  कोरोना अपडेट  महाराष्ट्र गुजरात सीमा  संचारबंदी परिमाण
रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांची गावी जाण्यासाठी पायपीट; महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अडकले मजूर

By

Published : Mar 28, 2020, 10:36 AM IST

Updated : Mar 28, 2020, 12:50 PM IST

पालघर - मुंबई, पुणे, मीरा-भाईंदर, वसई विरार येथील हजारो नागरिक हे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून चालत गुजरात, राजस्थानकडे निघाले. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाडजवळ शेकडोंच्या संख्येने हे बांधव काही तासांसाठी अडकून पडले होते.

लॉकडाऊनचा फटका : रोजंदारांवर गावी जाण्यासाठी आली पायपीटीची वेळ; महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच अडकले

एकीकडे राज्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश जारी असताना ही सर्व मंडळी एकत्रितपणे रस्त्यावर बसले होते. आम्ही रोजंदारीवर जगणारे असून लॉकडाऊनमुळे एका वेळचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी परत जाऊ देण्यात यावे, अशी विनंती या कामगारांनी पोलीस व प्रशासनाकडे केली.

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग व अन्य वरिष्ठ अधिकारी तोडगा काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी आपआपल्या ठिकाणी परत जावे. त्यासाठी राज्य शासनाने वाहने पुरवण्याची तयारी दर्शवली होती. तशा प्रकारच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या. मात्र, आपल्याला आपल्या मूळ गावी जाण्याचा या कामगारांचा अट्टाहास असल्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कामगारांशी संवाद साधला व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर त्यांना सुखरूपस्थळी पोहोचविण्यात आले.

Last Updated : Mar 28, 2020, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details