पालघर - नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे स्वत:चा आणि २ लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून आईने आपल्या २ मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील खारोंडा येथे घडली आहे. यात आई रुक्षणा आणि ३ वर्षाची चिमुकली दिपाली हिचा मृत्यू झाला असून ७-८ महिन्यांची रुषाली हिचा जीव वाचला आहे. तिच्यावर जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
पतीच्या आत्महत्येनंतर जगायचे कसे? या विवंचनेतून महिलेची चिमुकलीला घेऊन आत्महत्या - jawhar tahsil
नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे स्वत:चा आणि २ लहान मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून आईने आपल्या २ मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील खारोंडा येथे घडली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
रुक्षणाची नवऱ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच्या पश्चात २ लहान मुलींना जगवायचे कसे? या प्रश्नातून रुक्षणाने आत्महत्या केल्याची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Last Updated : Jul 7, 2019, 11:55 PM IST