महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आईनेचं केली पोटच्या 3 वर्षीय मुलीची हत्या, मृतदेह टाकला कचऱ्याच्या कुंडीत - आईनेचं केली पोटच्या 3 वर्षीय मुलीची हत्या

जन्मदात्या आईनेचं पोटच्या ३ वर्षीय मुलीची हत्या केली आहे (Woman kills 3 year old daughter). मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. मुलाची हत्या करुन तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधला. तिच्या घराजवळील बेकरीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तो फेकून दिला असे पोलिसांनी सांगितले (dumps body in garbage pile).

आईनेचं केली पोटच्या 3 वर्षीय  मुलीची हत्या
आईनेचं केली पोटच्या 3 वर्षीय मुलीची हत्या

By

Published : Sep 20, 2022, 10:49 PM IST

पालघर (जव्हार) - जिल्ह्यातील जव्हार येथे ह्दयद्रावक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेचं पोटच्या ३ वर्षीय मुलीची हत्या केली आहे ((Woman kills 3 year old daughter)). मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक चणचण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज जव्हार पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिला जव्हार पोलिसांनी भादंवि कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे. जव्हार इथल्या साना सुलेमान या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरा शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सनाची आई अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिनेच तिचा खून केल्याचे समोर आले. आपल्या पतीपासून विभक्त होऊन मागील दोन वर्षापासून तीन मुलांसह जव्हार येथे ती राहत होती. मात्र तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरून वाद होत असे. याच आर्थिक चणचणीला कंटाळून आरोपी आईने तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज जव्हार पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपीने मुलाची हत्या करुन तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधला. तिच्या घराजवळील बेकरीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तो फेकून दिला (dumps body in garbage pile) असे पोलिसांनी सांगितले. शेजारी आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला असता त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडला. त्यानंतर लोकानी महिलेला मारहाण केली, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुखापतीच्या खुणा असलेल्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details