पालघर - विरार रेल्वे स्थानकात एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या महिलेचे नाव स्वीटी शेख असे आहे. महिला आणि बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरार रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती, दोघेही सुखरूप - पालघर
विरार रेल्वे स्थानकातील २ आरपीएफ महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर महिला आणि बाळाला विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरार येथील रहिवासी स्वीटी गुरुवारी आपल्या पतीसोबत सकाळी ७ च्या सुमारास विरारहून रेल्वेने मिरारोड येथील रुग्णालया जाण्यासाठी निघाले होते. विरार रेल्वे स्थानकात पोहोचताच गरोदर असलेल्या स्वीटी यांच्या पोटात दुखू लागले. यासंदर्भात माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी आपल्या आरपीएफ महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेला जीआरपी कार्यालयात नेले. त्याठिकाणी २ आरपीएफ महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वीटी यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर महिला आणि बाळाला विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.