पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध तुरुंगात असलेल्याला कैद्यांचा भार कमी व्हावा, तसेच तुरुंगात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून, आठ तुरुंगामध्ये लॉकडाऊन काळात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने सुनावणी दरम्यान (अंडरट्रायल) स्थितीत असलेल्या सुमारे साडेपाच हजार कैद्यांना यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले आहे. आता सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या इतर सुमारे साडेपाच हजार कैद्यांना पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
"तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार"
ऑर्थर रोड तुरुंगातील स्वयंपाकीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने व त्याच्या या स्वयंपाकीच्या संपर्कात आल्याने तुरुंगातील 72 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथील गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकाळी भेट देत घटनेचा आढावा घेतला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले, निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगातील अकरा हजार कैदी संख्या कमी होईल. ऑर्थर रोड तुरुंगातील स्वयंपाकीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने व त्याच्या या स्वयंपाकीच्या संपर्कात आल्याने तुरुंगातील 72 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, असेही गृहमंत्री म्हणाले आहेत.