पालघर (वाडा)- पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते. जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. या भाज्यांबरोबरच खेकडेही बाजारात विकायला येतात. रानभाज्या आणि खेकडे या दिवसांमध्ये कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करतात.
रानभाज्या आणि खेकडे बाजारात दाखल, महागाईमुळे रानभाज्यांना ग्राहकांची पसंती - wada news
या जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापूर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात.
रानभाज्या
या जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात. वाडा शहरातील बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाल, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे बाजारात विकायला आणतात.
एक जुडी १० रूपयांत अशी रानभाजी विकली जाते. तर खेकडे प्रती नग तीन ते चार रुपयांना विकले जातात.