पालघर - माहीम ग्रामपंचायत हरणवाडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये टाकीजवळ उभे असलेले 3 जण थोडक्यात बचावले आहेत.
माहीममधील हरणवाडीला पुरवठा करणारी टाकी कोसळली, सुदैवाने जीवीतहानी टळली - पालघर
अवघ्या ५ ते ६ वर्षांपूर्वी या टाकीचे बांधवकाम करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळल्याने याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
माहीम ग्रामंचायत हरणवाडीला पाणी पुरवठा करणारी टाकी कोसळली
आज सकाळीच या टाकीत पाणी भरण्यात आल्याचे उपसरपंच नरोत्तम राऊत यांनी सांगितले. अवघ्या ५ ते ६ वर्षांपूर्वी या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे ही टाकी कोसळल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.