वाडा (पालघर) - जिल्ह्यातील वाडा-भिवंडी हा महामार्ग खड्डेमय झाला आहे. अनेक वेळा या मार्गाची दुरुस्ती होते. मात्र, ही दुरुस्ती काही अंशी ठरत असून पुन्हा या ठिकाणी खड्डे पडतात. अनेक या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या समस्येवर मोर्चे आंदोलने होत असतात. मात्र, अजून दुरुस्तीच्या नावाखाली किती दुरुस्त्या होतील आणि किती या ठिकाणी रस्ते अपघातात बळी जातील ? हा प्रश्न या रस्त्याच्या दुरवस्थेवेळी उपस्थित होत असतो.
वाडा-भिवंडी महामार्गाची दुरवस्था, दुरुस्तीसह रस्ते अपघात समस्या कायम - wada taluka road repair latest news
पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न सतत चर्चेत येत असतो. यात भिवंडी-वाडा या महामार्गावर खड्डे पडलेले असतात. याची डागडूजी होत असते. मात्र, ही डागडूजी तग धरत नाही.
पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गच्या दुरवस्थेचा प्रश्न सतत चर्चेत येत असतो. यात भिवंडी-वाडा या महामार्गावर खड्डे पडलेले असतात. याची डागडूजी होत असते. मात्र, ही डागडूजी तग धरत नाही. ही दुरवस्था कायम होत असते. रस्ते अपघाताच्या घटनाही घडून गेल्या आहेत. याच मुद्यावर आंदोलने होत असतात. दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेली दुरुस्ती. ही रस्त्याची दुरावस्थेचा प्रश्न कायम रहातोय. रस्त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे.