पालघर - मुंबई आणि पालघर जिल्ह्यात २ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा येथील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पश्चिम रेल्वेची लोकल सेवा चर्चगेट ते वसई यादरम्यान सुरू आहे.
रेल्वे रुळांवर पाणी; नालासोपारा ते विरार लोकलसेवा ठप्प
पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा येथील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे नालासोपारा ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रेल्वे रुळांवर पाणी
डहाणू वरून ४ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, बोरिवलीतून ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकलही रद्द करण्यात आली आहे. ५ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी पनवेल मेमु आणि अंधेरी लोकल वलसाड एक्सप्रेस, फ्लाईंग राणी एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. लोकल रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.