महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळावे असे एखाद्या शेंबड्या पोरालाही वाटणार नाही' - assembly election of maharashtra

विनोद तावडे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर विनोद तावडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्यास त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य केले अशोक चव्हाण यांनी होते. यावर आज विनोद तोवडे यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेस पक्षात जाऊन तिकीट मिळावे, असे एखाद्या शेंबड्या पोरालाही वाटणार नाही, अशी टीका केली.

विनोद तावडे

By

Published : Oct 14, 2019, 2:48 PM IST

Updated : Oct 14, 2019, 3:05 PM IST

पालघर- काँग्रेस पक्षात जाऊन तिकीट मिळावे, असे एखाद्या शेंबड्या पोरालाही वाटणार नाही. अशोक चव्हाण यांनी माझ्या तिकिटाची काळजी करण्यापेक्षा स्वतःची जागा निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी खोचक टीका विनोद तावडे यांनी केली.


विनोद तावडे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर विनोद तावडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्यास त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य केले अशोक चव्हाण यांनी होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडेंनी ही खोचक टीका केली आहे.

बोलताना विनोद तावडे

हेही वाचा - फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचे तावडेंना प्रत्युत्तर

मागील पाच वर्षात मोदी सरकारने व फडणवीस सरकारने विविध विकास कामे केली असून जास्तीत जास्त लोकांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे. विनोद तावडे आज (सोमवार) डहाणू विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार पास्कल धनारे यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे आले होते, त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा - पालघर - बोईसर रस्ता रुंदीकरणासाठी पडणार २९१ झाडांवर कुऱ्हाड

Last Updated : Oct 14, 2019, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details