महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकाला अटक - construction

बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधल्याप्रकरणी, नालासोपारा पूर्वे, सेन्ट्रल पार्क येथील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव यांना पोलिसांनी आचोळे रोडवरील डी-मार्ट परिसरातून अटक केली. जाधव यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव फरार होते. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक केली.

अरुण जाधव

By

Published : May 30, 2019, 1:33 PM IST

पालघर - बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधल्याप्रकरणी, नालासोपारा पूर्वे, सेन्ट्रल पार्क येथील बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव यांना पोलिसांनी आचोळे रोडवरील डी-मार्ट परिसरातून अटक केली. जाधव यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव फरार होते. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्यांना अटक केली. जाधव यांना वसई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


अरुण जाधव याने मौजे मोरे येथील सर्व्हे क्रमांक ९९ हिस्सा क्रमांक ३ वर सिडकोची बनावट परवानगी दाखवून सिद्धीविनायक नावाची बहुमजली इमारत उभारली होती. ही इमारत तयार करून त्यातील सदनिकांची विक्री करण्यासाठी जाधव यांनी बनावट परवानगीचा वापर केल्याचा अभिप्राय उपसंचालकांनी पडताळणीनंतर दिला. बांधकाम आणि बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश नगररचना विभागाने सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानंतर पालिकेने जाधव यांना नोटीस बजावली होती.


मात्र, तरीही बांधकामाचा वापर करण्यात येत होता. पालिककेकडे ठोस पुरावे असतानाही त्यांच्या या इमारतीवर कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. त्यानंतर बदली होऊन आलेले नवीन सहाय्यक आयुक्त विजय चव्हाण यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून १२ एप्रिलला तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details