पालघर/विरार - वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात भ्रष्टाचाराची प्रकरणे अद्यापही समोर येतच आहेत. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईत नगररचना विभागाच्या एका लिपिकाला 8000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जमीन खरेदी व्यवहारात ना हरकत प्रमाणपत्र देण्याासाठी आलोसे नावाच्या लिपिकाने ही लाच मागितली होती. या कारवाईमुळे वसई-विरार पालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे इस्टेट एजंट असून तो जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करतो. त्याअनुषंगाने त्यांच्याकडील खरेदीदार यांना मौजे कामण येथे खरेदी केलेल्या जामिनीचा पोटहिस्सा वेगळा करुन हवा होता. त्यासाठी त्यांना ना हरकत दाखला आवश्यक होता. तो मिळण्यासाठी खरेदीदाराने वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते. मात्र हा दाखला देण्याकरता यातील लिपिक आलोसे याने तक्रारदारांकडून रु. १०,०००/- मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लांच प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार दिली.
तक्रारदाराकडून लिपिकाविरोधा प्राप्त झालेल्या तक्रारीनुसरा एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, लिपिक आलोसे यांनी शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त ८,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर एसीबी सापळा लावून ही रक्कम देऊ केली असता, पंचासमक्ष आलोसे यांनी ती रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याला रंगेहात अटक केली.
वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात लाचखोरी सुरूच, लिपिकास रंगेहात अटक - नगरविकास विभाग लिपिक
खरेदी केलेल्या जामिनीचा पोटहिस्सा वेगळा करुन हवा होता. त्यासाठी त्यांना ना हरकत दाखला आवश्यक होता. तो मिळण्यासाठी खरेदीदाराने वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते. मात्र हा दाखला देण्याकरता यातील लिपिक आलोसे याने तक्रारदारांकडून रु. १०,०००/- मागणी केली होती.
लिपिकास रंगेहात अटक
2017 मध्ये नगररचनाकार अधिकाऱ्यानेही 25 लाखांची घेतली होती लाच-
विशेष म्हणजे पालिकेच्या नगररचना विभागाचे नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांनाही तब्बल २५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याने २०१७ मध्ये ठाण्यात अटक केली होती; तेच वाय. एस. रेड्डी वसई-विरारकरांच्या दुर्दैवाने आजही पालिकेचे नगररचनाकार पद भूषवत आहेत.