पालघर-स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिटने अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करत 1 कोटी 58 लाख 70 हजार रुपये किमतीचा 70 किलो 240 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी सोनाराम रामकिशन बिष्णोई (वय 33) व भजनलाल मालाराम बिष्णोई (वय 22) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पालघर : दोन अमली पदार्थ तस्करांना अटक; 1 कोटी 58 लाख 70 हजार किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त - पोलीस
वसई तालुक्यातील नायगाव पूर्व परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखाने कारवाई करत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. आरोपींकडून एक सफेद रंगाची स्कॉर्पिओ कारही जप्त करण्यात आली आहे.
वसई तालुक्यातील नायगाव पूर्व परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखाने कारवाई करत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. आरोपींकडून एक सफेद रंगाची स्कॉर्पिओ कारही जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1200 ग्रॅम वजनाचे अफिम, 1 कोटी 38 लाख रुपये किमतीचा 59 किलो वजनाच्या अफूच्या झाडाचा बंड्याचा चुरा तसेच 4 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 1 कोटी 58 लाख 70 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखने डहाणू येथे 85 किलो गांजा जप्त केला होता.
दोन्ही आरोपींविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.सी कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.