महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हिडिओ व्हायरल - भाजप

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

By

Published : Apr 2, 2019, 1:27 PM IST

पालघर - पालघरमध्ये भाजपचा उमेदवार निवडुन येऊ शकेल, असे वातावरण असून कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. पालघरची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. नाराज भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील व्हायरल व्हिडीओ.

पालघरच्या जागेसाठी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत युतीच्या सभा, मेळाव्याला न जाण्याचा निर्णय गुरुवारी डहाणू-सरावली येथे भाजपच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आहे. त्यामुळे पक्षातील बंड समोर आले आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. नगराध्यक्ष भरत राजपूत, आदिवासी आघाडी प्रमुख हरिश्चंद्र भोये, लुईस काकड, नंदकुमार पाटील, विना देशमुख महीला आघाडी प्रमुख, सरपंच सुरेश शिंदा, जगदिश राजपूत, विवेक कोर आदी या सभेत उपस्थित होते.

राजेंद्र गावितांना निवडणूक अडचणीची ठरणार

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेने भाजपवर दबाब टाकून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. शिवसेनेचे इच्छूक उमेदवार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता भाजपचे विद्ममान खासदार गावित यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. राजेंद्र गावित यांना भाजपातून होत असलेला विरोध शमविण्यात ते कशा प्रकारे यशस्वी होतात, हे पाहावे लागेल. गावित यांना होत असलेला विरोध पाहता त्यांनाही निवडणूक अडचणीची जाणार हेही तितकेच खरे.

ABOUT THE AUTHOR

...view details