पालघर - जव्हार तालुक्यातील दाभालोनपैकी गुंजुंन पाड्यातील दोन व्यक्तींचा साकळतोडी नदीत वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जाना सोनू उंबरसाडा (वय६०) व काकड बाबन उंबरसाडा (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.
साकळतोडी नदीत वाहून दोघांचा मृत्यू; जव्हार तालुक्यातील घटना - गुंजन पाडा
जव्हार तालुक्यातील दाभालोनपैकी गुंजुंन पाड्यातील दोन व्यक्ती साकळतोडी नदीत वाहून गेले होते. त्या दोघांचा मृतदेह आज ते वाहून गेलेल्या ठिकाणाहून जवळपास १३ किलोमीटर अंतरावर सापडले आहेत.
मृत जाना उंबरसाडा आणि काकड उंबरसाडा
जाना आणि त्याचा पुतण्या काकड हे दोघे सिल्वासा केंद्रशासित प्रदेशालगत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंन पाडा येथील रहिवासी आहेत. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे दोघेही गावाजवळील साकळतोडी नदीत वाहून गेले.
दरम्यान, आज या दोघांचे मृतदेह ते वाहून गेलेल्या ठिकाणाहून जवळपास १३ किलोमीटर अंतर लांब सापडले आहेत. तर त्यांच्या मृत्यूची अपघातग्रस्त नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.