पालघर -भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरार येथील जिवदानी गडावर रविवारी झालेल्या अपघातात दोन मजूर जागीच ठार झाले. गडावर जाण्यासाठी फ्युनिक्यूलर ट्रॉलीसाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना झालेल्या अपघातामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. गणेश अशोक वायडा (वय-26, रा. जिवदानी पाडा, विरार) येथील रहिवासी होता तर जयवंत जगन हडाळ (वय-38, रा. माकूणसार, सफाळे) अशा या दोन मृत व्यक्तींची नावे आहेत.
जिवदानी गडावर तोल जाऊन दोन मजूर ठार - जिवदानी गड विरार अपघात
गणेश अशोक वायडा (वय-26, रा. जिवदानी पाडा विरार), जयवंत जगन हडाळ (वय-38, रा. माकूणसार सफाळे) अशा या दोन मृत व्यक्तींची नावे आहेत.
हेही वाचा - दोन मोबाईल चोरटे गोंदिया रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात
विरार पूर्व येथील जिवदानी मंदिर ट्रस्टमार्फत भाविकांच्या सोयीसाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉलीचे काम सुरू आहे. या ट्रॉलीचे काम सुरू असताना रविवारी सकाळी 5 नंबर कॉलमवरून दोन मजुरांचा तोल गेला व ते 10 ते 15 फुट खाली कोसळले. चेहऱ्याला व डोक्याला गंभीर जखमा झालेल्या दोघांना नजीकच्या संजीवनी रूग्णालयात तत्काळ नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
हेही वाचा - पंधरा लाखांच्या अपहार प्रकरणी दोन प्रकल्पाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल