पालघर (वाडा)- जव्हार तालुक्यातील सिल्वासा रोडजवळ असलेल्या पासोडीपाडा येथील जंगलात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत घरात बांधलेली जनावरेदेखील जळाली असून दोन्ही घरांतील कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
अचानक लागलेल्या आगीत दोन घरे खाक - घरातील सामान,पैसे आणि जनावरे जळून खाक
जव्हार तालुक्यातील सिल्वासा रोडजवळ असलेल्या पासोडीपाडा येथील जंगलात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत घरात बांधलेली जनावरेदेखील जळाली असून दोन्ही घरांतील कुटुंबे उघड्यावर आली आहे.
आगीत घरे आणि जणावरे खाक झाल्याचे छायाचित्र
जव्हारमधील पासोडीपाडा पोस्ट साखरशेत येथे रमेश रोज व शंकर जानू रोज या दोन आदिवासी समाजातील लोकांची घरे होती. दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या दोन्ही घरातील सामान, पैसे आणि जनावरे जळून खाक झाली आहेत. आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे दोन लोकांच्या कुटुंबाचा संसार मात्र उघड्यावर आला आहे.