पालघर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात कर्फ्यू लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात सतत प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांची आता चांगलीच अडचण झाली आहे. अनेक ट्रक चालक देशातील अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत ट्रक चालकांचे हाल - Mumbai Ahmadabad highway
देशातील अनेक राज्यात भ्रमण करणारे ट्रक चालक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर असलेल्या धाबे, हॉटेल आणि पेट्रोल पंपावर हजारो ट्रक चालक, हेल्पर आठवडाभरापासून अडकून पडले आहेत.
देशातील अनेक राज्यात भ्रमण करणारे ट्रक चालक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर असलेल्या धाबे, हॉटेल आणि पेट्रोल पंपवर हजारो ट्रक चालक, हेल्पर आठवडाभरापासून अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील पैसे संपल्याने जेवण ही उपलब्ध होत नाही. शासन आणि मालकाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने सध्या मिळेल ते खाऊन हे दिवस काढत आहेत.
एकाच ठिकाणी शेकडो ट्रक चालक, क्लिनर अडकून पडले असून यापैकी कोणाला कोरोनाची लागण आहे की नाही याची साधी तपासणीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ट्रक चालकांनी केले आहे.