पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार नजीक दोन कंटेनर आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर तिन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. या रस्त्यावर एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांचा लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ३ ट्रकचा अपघात, वाहतूक खोळंबली
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार नजीक दोन कंटेनर आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर तिन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सकवार येथे तीन ट्रकमध्ये भीषण अपघात
दोन कंटेनरचा अपघात झाल्यानंतर पुट्ट्याने भरलेला ट्रक अपघातग्रस्त कंटेनरवर जाऊन आदळला. यात स्पार्क होऊन तिन्ही वाहनांनी पेट घेतला. तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
चार ते पाच तासंपासून प्रवासी वाहतूक कोंडीत अडकून
पहाटे झालेल्या या अपघातामुळे मुंबईहून गुजरात दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. नालासोपारा फाट्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यात अनेकजण अडकून पडले. आपले कामाचे ठिकाण गाठण्यासाठी चाकरमानीची चांगलीच धावपळ झाली. महामार्ग पोलिसांकडून येथे झालेल्या दुर्घटनेमुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवली. तब्बल पाच तास या महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
TAGGED:
truck accident in palghar