पालघर- शहर परिसरात पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 4 ठिकाणी घरांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
पालघरमध्ये 4 ठिकाणी घरांवर झाडे कोसळली; मोठ्या प्रमाणात नुकसान - पाऊस
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या घरावरून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.
रविवारी सकाळी पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पालघर येथील डूंगीपाडा, खाणपाडा, नवली, लोकमान्य नगर या 4 ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली आहे. डुंगी पाडा येथे झाड पडून ३ घरांचे नुकसान झाले असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. तसेच लोकमान्य नगर, खाणपाडा येथे झाड पडून घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या घरावरून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.
झाड पडल्याच्या या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी घराचे नुकसान झालेल्या नागरिकांनी केली आहे.