पालघर -कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामीण भाग नॉन रेड झोन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
लॉकडाऊन शिथिल, नागरिक विनाकारण घराबाहेर; पालघरमध्ये वाहतूक कोंडी
पालघर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, असे असले तरीही पालघर शहरात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर बाहेर पडत असून नागरिकांना कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचेही दिसून येत आहे.
पालघर न्यूज
पालघर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, असे असले तरीही पालघर शहरात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. पालघर शहरात सकाळ पासूनच पालघरकरांनी रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये गर्दी केली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावयास पाहायला मिळाले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर बाहेर पडत असून नागरिकांना कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचेही दिसून येत आहे.