महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साखरा येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने जव्हार-विक्रमगड मार्गावरील वाहतूक मंदावली - Rain

साखरा येथील जुना पूल पाण्याखाली गेल्यामुळे जव्हार-विक्रमगड मार्गावरील वाहतूक मंदावली. नवीन पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्याने वाहनधारकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागतो.

साखरा पुलावरुन सुरु असलेली वाहतूक

By

Published : Jul 8, 2019, 9:37 PM IST

Updated : Jul 8, 2019, 9:52 PM IST

पालघर (वाडा)- मुसळधार पावसामुळे विक्रमगड -जव्हार मार्गावरील साखरा येथील जुना पूल पुरामुळे पाण्याखाली गेला. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक मंदावली.

साखरा पुलावरुन सुरु असलेली वाहतूक

वाडा-जव्हार आणि विक्रमगड-जव्हार या दोन तालुक्यांना जोडणारा साखरा येथील जुना पूल पाण्याखाली गेला. विक्रमगड-जव्हार रोडवरील साखरा येथे नवीन पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहतूक जुन्या पुलावरून सुरु आहे.

पुराचे पाणी वाहत असूनही जीव धोक्यात घालून वाहन चालकांना या ठिकाणी वाहन चालवावे लागते. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून प्रति दिन एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग विक्रमगडचे उपअभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Last Updated : Jul 8, 2019, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details