पालघर-विरार येथे तरुणावर गुंडांनी हल्ला करून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, अश्रफ अब्बास खान असे जखमी तरुणाचे नाव आहे.
विरारमध्ये तरुणावर गुंडांचा हल्ला;तरुण गंभीर जखमी - पालघर
विरार येथे तरुणावर गुंडांनी हल्ला करून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, अश्रफ अब्बास खान असे जखमी तरुणाचे नाव आहे .
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच, विरार पूर्व येथील जीवदानीपाडा परिसरात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तरुणावर गुंडांनी हल्ला करून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. अश्रफ अब्बास खान असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या छातीवर, खांद्यावर, मांडीवर चाकूने वार करण्यात आले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंटू बबनालाल मिश्रा असे वार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो फरार आहे. याप्रकरणी विरार पोलीस अधिक तपास करीत आहेत.