पालघर -जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज(रविवार) तीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामुळे, ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा आकडा १५७ वर जाऊन पोहोचला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3 कोरोना बाधित रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या 157 - पालघर कोरोना रुग्णसंख्या
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 157 कोरोनाबाधित रुग्ण अढळून आले आहेत. त्यातील 78 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 3 कोरोना रुग्ण आढळले असून दोन रुग्ण पालघर तालुक्यातील व एक रुग्ण वसई ग्रामीण भागातील आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 157 कोरोनाबाधित रुग्ण अढळून आले आहेत. त्यातील 78 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 73 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर तालुक्यात आढळून आलेले दोन्ही रुग्ण बोईसर येथील आहेत. बोईसर, ओस्तवाल कॉम्प्लेक्स येथील 21 वर्षीय तरुणी व ५२ वर्षीय पुरुष हे दोघे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते. यानंतर, त्यांची कोरोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच वसई तालुक्यातील ग्रामीण भागात आढळून आलेला एक रुग्ण कळंब येथील रहिवासी आहे. तर, मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या 36 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.