पालघर-जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ३७ कोरोना रुग्ण; ६१ कोरोनामुक्त
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ३७ रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या आता १६२९ इतकी झालीय. आतापर्यंत २२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
३७ कोरोना रुग्णांपैैकी १२ पालघर तालुक्यातील, ६ डहाणू तालुक्यातील, ४ वाडा तालुक्यातील, १ विक्रमगड तालुक्यातील, १ जव्हार तालुक्यातील व १३ वसई ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उपचारादरम्यान दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक रुग्ण जव्हार तालुक्यातील आणि दुसरा रुग्ण वसई ग्रामीण भागातील आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १६२९ इतकी झाली असून, २२ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १११० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४९७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.