पालघर - एका मोबाईल दुकानात गल्ल्यातील पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. मुख्य म्हणजे, चोरटा फोन दुकानातच विसरून गेल्याने त्याच्या आधारावर त्याला तत्काळ पकडण्यात यश आले.
मोबाईल दुकानातील गल्ल्यावरील पैशावर डल्ला मारणारा अवघ्या चार तासात जेरबंद... वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी मोबाईल अॅण्ड ट्रॅव्हल्स या दुकानात सोमवारी रात्री आठ वाजता एक चोरटा ग्राहक बनून आला. त्याने फोन विकत घेण्याच्या बहाण्याने दुकान मालकाला गुंतवून गल्ल्यातील 28 हजार रुपये चोरले. मात्र ही बाब दुकानमालकाच्या लक्षात येताच त्याने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकान मालकालासोबत झालेल्या झटापटीत चोरटा त्याचा फोन दुकानातच विसरून गेला. ही सपुर्णं घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
हेही वाचा - वृद्ध दाम्पत्याचे एक लाख रुपये चोरणाऱ्या ओडिशातील दोघांना अटक
याप्रकरणी दुकानमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मोबाईलवरील काॅल रेकाॅर्डच्या आधारावर त्याच्या तीन मित्रांना नालासोपाऱ्यातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर आकाशचंद्र प्रकाश चौबे नामक मित्राचा तो फोन असल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यना, पोलिसांनी लगेच आकाशचंद्र चौबेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 18 हजार रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन उर्वरीत 10 हजार रूपये त्याने खर्च केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वसई सत्र न्यायालयात आरोपीला मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहे.