पालघर- नऊ महिन्यांपासून बेकारी, त्यानंतर रोजगार बुडाल्यामुळे हजारो कुटुंब उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत. रिक्षाचालकांची परिस्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे. चार ऐवजी दोनच प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत बुडालेले उत्पन्न यामुळे रिक्षा चलाकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत महिलेने विसरलेली दागिन्याची पर्स हाती लागली. पण, नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकाने ती बॅक परत करत आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 16 डिसें.) रात्री घडला आहे.
प्रवासी आसनाच्या मागील मोकळ्या जागेत सापडली पर्स
याबाबत सविस्तर वृत्त असे, प्रदीप मोहिते (रा. डांगे कॉम्प्लेक्स, समेळगाव) हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी वाहतूक करत होते. बुधवारी (दि. 16 डिसें.) सायंकाळी मोहिते यांनी त्या महिलेला (मुळ रा. गुजरात) नालासोपारा स्टेशनला सोडले. तेथून ते आपल्या रिक्षा थांब्यावर परले. त्यानंतर प्रवासी आसनाच्या मागील मोकळ्या जागेत एक लेडीज पर्स सापडली. या पर्समध्ये बांगड्या, अंगठ्या, कार्णफुले, असे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, अशी महत्वाची कागदपत्रे होती.