पालघर- जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळी भाताने (नवसई) येथे पुरात 10 व्यक्ती अडकले होते. अग्निशमन दलाने यापैकी 4 जणांना सुखरूप बाहेर काढले असून उर्वरित 6 जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
पालघरमध्ये पुरात 10 जण अडकले; 4 जणांना अग्निशमन दलाने सुखरूप काढले बाहेर - heavy rain
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळी पुरात अडकलेल्या 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
पालघर
जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे व उपविभागीय अधिकारी यांनी नवसई येथे भेट देऊन पूरग्रस्तांना रेस्क्यू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.