पालघर/विरार - वीज मीटर कापल्याच्या रागाने एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून त्यांना मीटररूम मध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार विरार मध्ये घडला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून २०-२५ मनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
वीज कापण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मीटर रूममध्ये ठेवले डांबून - पालघर महावितरण
महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा एका महिलेशी वाद झाला. वीज मीटर कापल्याच्या रागाने एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून त्यांना मीटररूम मध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार विरार मध्ये घडला आहे.
विरार पूर्वेच्या पाचपायरी परिसरातील गोविंद एकता या सोसायटीत महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा एका महिलेशी वाद झाला. या महिलेने आपले थकीत वीजबील भरले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिचा वीजमीटर कापण्यास सुरुवात केली. मग काय? या महिलेचा संताप अनावर झाला व तिने चक्क मीटररूम मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेरून टाळे ठोकले. हे कर्मचारी लॉक खोलण्यासाठी बऱ्याच विनवण्या करीत होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून २०-२५ मनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.