पालघर (वाडा) - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील भालिवली गावाजवळ (एम एच ४३ बी बी १०२१) या रेफ्रिजरेटर वाहनाला अचानक आग लागली. हे वाहन गुजरातहून मुंबइच्या दिशेने येत होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे.
'रेफ्रिजरेटर'युक्त वाहनला अचानक लागली आग, जीवितहानी नाही - santosh
गुजराहून मुंबईच्या दिशेने रेफ्रिजरेटरयुक्त वाहनाला मुंबई - अहमदाबाद महामार्गा भालिवली गावाजवळ अचनाक आग लागली. चालक प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
आगीत जळालेले वाहन
ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी पावसाने हजेरी लावली होती. तरी वाहनाला आग लागली. चालक जावेद शेख (रा.गोवंडी) याला आपल्या वाहनातून धूर येत असल्याचे कळताच तो वाहनातून बाहेर पडला. यावेळी महामार्ग पोलिसांनी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. अग्निशमनदल पोहोचेपर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.