पालघर - थंडीची चाहूल लागताच जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. वाढवण, चिंचणी, डहाणू खाडी या भागात सध्या 'कलहंस' हे आकर्षक पक्षी स्थलांतरित झालेले पहायला मिळत आहेत.
थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन - पालघरमध्ये कलहंस पक्षी
वाढवण, चिंचणी, डहाणू खाडी या भागात सध्या 'कलहंस' हे आकर्षक पक्षी स्थलांतरित झालेले पहायला मिळत आहेत. कलहंस या पक्षाला इंग्रजीत Greylag Goose असे म्हणतात. हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसासारखा दिसतो. शेपटीकडील भाग करडा आणि चोच मांसल गुलाबी असा या पक्षाचा रंग आहे.
थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन
हेही वाचा -नवी मुंबईत फ्लेमिंगोचे आगमन, सफरीला सुरुवात...
कलहंस या पक्षाला इंग्रजीत Greylag Goose असे म्हणतात. हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसासारखा दिसतो. शेपटीकडील भाग करडा आणि चोच मांसल गुलाबी असा या पक्षाचा रंग आहे. कलहंस पक्षी प्रामुख्याने पाकिस्तान, मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात आढळतात. मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात कलहंस दुर्मिळ आहे. नद्या, सरोवरे, धानाची शेती आणि गवती कुरणांच्या भागात हे पक्षी वास्तव्य करतात.
Last Updated : Dec 7, 2019, 3:26 PM IST